एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब… Continue reading एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, या मागणीसाठी वेतनासाठी संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे जळगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र सरकारला जाग आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस आणि दोन महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना… Continue reading एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मनपाच्या ‘या’ परिपत्रकामुळे मुंबईकरांची दिवाळी यंदा शांत, शांतच…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हाच कित्ता आता मुंबई महापालिकेनेही गिरवायचा ठरवलं आहे. मुंबई महापालिकेने आज (सोमवार) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईकरांना दिवाळीच्या काळात केवळ लक्ष्मीपूजनादिवशीच सौम्य स्वरूपाचे फटाके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य दिवस फटाके फोडण्यावर बंदी असेल, यामुळे यंदा दिवाळीतील बालचमूंच्या, तरुणांच्या उत्साहावर विरजण पडणार… Continue reading मनपाच्या ‘या’ परिपत्रकामुळे मुंबईकरांची दिवाळी यंदा शांत, शांतच…

पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

मुंबई (प्रतिनिधी) : फेसबुकची उपकंपनी असलेले व्हॉटस्अॅप हे भारतातील सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. नेहमी नवनवीन फिचर देणाऱ्या व्हॉटस्अॅपकडून आता युजर्सना पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी सायंकाळी व्हॉटस्अॅपला ‘यूपीआय’ आधारित पेमेंट सेवेसाठी मंजुरी दिली. सध्या या सेवेसाठी व्हॉटस्अॅपने अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक… Continue reading पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये, अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे झाडले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. सुशांतसिंग रजपूत… Continue reading ‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. पण आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (बुधवार) दिली. विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या… Continue reading आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज (बुधवार) रायगड पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीय. अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात गेलो असताना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या… Continue reading भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

नव्या आदेशामुळे ‘मेट्रो’वरून केंद्र-राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष !

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने  या निर्णयाला विरोध केला. तर आज (मंगळवार) केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिला आहे. याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविण्यात आले आहे. कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे ही जागा ‘एमएमआरडीए’ला देण्याचा… Continue reading नव्या आदेशामुळे ‘मेट्रो’वरून केंद्र-राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष !

गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक -५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे २४ तासांच्या आत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी… Continue reading गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही… Continue reading पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

error: Content is protected !!