धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार

मुंबई (प्रतिनिधी) : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आय़पीएल  २०२३ च्या लिलावात बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून संघात घेतले आहे. चेन्नईने स्टोक्ससाठी १६.२५ कोटी रुपयांची बोली लावली. अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्यासह स्टोक्स संघाचे नेतृत्वही करू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात स्टोक्स येताच धोनीनंतर त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा सुरू झाली. आता या… Continue reading धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई : जवळच्या मित्रानेच विश्वासघात करत इतर मित्रांच्या सहाय्याने लोअर परेल परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला असून, याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ६ आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन आहेत, तर ३ जण प्रौढ आहे. दरम्यान, गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी या सहाही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.… Continue reading मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जयंत पाटील, शरद पवार अजित पवारांवर नाराज

मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी देखील विरोधकांच्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देत आहेत. दिशा सालियान प्रकरण संसदेत चांगलेच गाजले. त्यानंतर जयंत पाटील यांनी असंसदीय शद्बाचा वापर केल्याने त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधक चांगलेच… Continue reading जयंत पाटील, शरद पवार अजित पवारांवर नाराज

खोके घेणारेच तुरुंगात जाऊन आलेत : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आलेत. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते ठोकशाहीची भाषा करतात, अशा शब्दात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. खोके घेणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशापेक्षा आमदारकी मोठी आहे. जे चार वेळा… Continue reading खोके घेणारेच तुरुंगात जाऊन आलेत : केसरकर

मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नागपुरात येऊन घोटाळा उघड करु, असा इशाराच खा. संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांवरचे घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातली कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. भूखंड घोटाळ्याच्या या सर्व प्रकारावर अण्णा हजारे गप्प का? असा… Continue reading मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु : संजय राऊत

शेअर बाजार गडगडला

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा वाईट ठरला आहे. आठवड्याचा व्यवहाराचा शेवटचा दिवस तर ब्लॅक फ्रायडे ठरला. शुक्रवारी सेन्सेक्स ९८०.९३ अंकांनी कोसळून ५९,८४५.२९ अंकांवर आला, तर निफ्टी ही ३२०.५५ अंकांनी घसरून १७,८०६.८० अंकांवर घसरला. मागील सात व्यवहारांच्या दिवसांत ६ वेळा शेअर बाजार कोसळला. या घसरणीमुळे गेल्या ७ दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १९… Continue reading शेअर बाजार गडगडला

महाराष्ट्र कर्नाटकला जशास तसे उत्तर देणार : शंभूराज देसाई  

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारने नुकताच आपल्या विधानसभेत महाराष्ट्राचा दावा असलेली गावे कर्नाटकचीच असल्याचा ठराव मंजूर केला. यानंतर आता महाराष्ट्राकडून जसास तसे उत्तर देण्यात येणार आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. सीमाप्रश्नी तोडग्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘आपण कर्नाटकपेक्षा अधिक सक्षम आणि परिणामकारक ठराव आणणार आहोत. आजच आम्ही… Continue reading महाराष्ट्र कर्नाटकला जशास तसे उत्तर देणार : शंभूराज देसाई  

कंगना रनौतवर नेटकरी भडकले

मुंबई (प्रतिनिधी) : कंगना रनौत ही नेहमी आपल्या वक्तव्यामूळे चर्चेत असते. कधी ती कुणाला झाडते, कौतुकाचा वर्षाव करते. आता तर तिने स्वत:ची तुलना चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशीच केली आहे. कंगना रनौतने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गायिका आशा भोसले दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत आहेत. व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगत आहेत… Continue reading कंगना रनौतवर नेटकरी भडकले

भाजप क्लीन चीटचा कारखाना : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी क्लीन चीटच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी क्लीन चीट देण्याचा कारखाना काढला आहे. उद्या ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनाही क्लिन चीट देतील. उद्या दाऊदने भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यालाही क्लीन चीट मिळेल. अबू सालेम तुरुंगात आहे. त्याने पत्र लिहून भाजपबद्दल बरं बोलला तर त्यालाही क्लिन चीट… Continue reading भाजप क्लीन चीटचा कारखाना : संजय राऊत

शेअर बाजारात अस्थिरता

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील व्यवहारात आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे. प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. व्यवहार सुरू झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर पुन्हा एकदा विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजार आणि एसजीक्स निफ्टीत तेजी दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  आज… Continue reading शेअर बाजारात अस्थिरता

error: Content is protected !!