मुंबई (प्रतिनिधी) : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आय़पीएल  २०२३ च्या लिलावात बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून संघात घेतले आहे. चेन्नईने स्टोक्ससाठी १६.२५ कोटी रुपयांची बोली लावली.

अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्यासह स्टोक्स संघाचे नेतृत्वही करू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात स्टोक्स येताच धोनीनंतर त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा सुरू झाली. आता या सगळ्या चर्चा सुरू असताना चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीएसकेडे सीईओ काशी विश्वनाथ यांनी म्हटले की, स्टोक्सला संघात घेतल्यानंतर आम्ही खूप आनंदी होतो आणि नशीबवानसुद्धा कारण शेवटी तो आमच्या संघाला मिळाला. आम्हाला एक अष्टपैलू क्रिकेटर हवा होता आणि स्टोक्सला घेतल्याने एम. एस. धोनीही आनंदी होता. कर्णधारपदाचा पर्याय आहे, पण धोनी वेळेनुसार याबाबत निर्णय घेईल.