पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी छावण्या उदध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आज कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सैन्यदलाच्या प्रवक्त्याने व्यक्त… Continue reading पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

लवकरच वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली जारी करण्याचा आणि नियामक यंत्रणाही बळकट करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये कामामध्ये हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा उद्देश नाही, मात्र, वृत्तवाहिन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज आहे,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. एका वेबिनारमध्ये जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा… Continue reading लवकरच वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली : प्रकाश जावडेकर

मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग : आ. अतुल भातखळकर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारची माफी अथवा सवलत मिळणार नाही, वीज वापरली असेल तर बिल भरावे लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले. यामुळे सर्व थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. भाजपाने जोरदार टीका तर केलीच, त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडणार असल्याचा इशारा आ. अतुल… Continue reading ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग : आ. अतुल भातखळकर

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे  थोड्या कालावधीपुरता लॉकडाऊनचा प्रस्ताव पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाऊन असेल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. केजरीवाल म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्‍या लोकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. आता फक्त… Continue reading दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन..?

महाराष्ट्रासह सहा नुकसानग्रस्त राज्यांना केंद्र सरकारकडून निधी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे नुकसान सोसावे लागलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांना ४३८१.८८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्किम या राज्यांचाही समावेश आहे. यावर्षी चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading महाराष्ट्रासह सहा नुकसानग्रस्त राज्यांना केंद्र सरकारकडून निधी…

शिवप्रेमींसाठी खुशखबर; रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, पण..

रायगड (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मागील ७ ते ८ महिने संपूर्ण देशात मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यत आली आहेत. पण हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने उद्योग-व्यवसाय सुरू होत आहेत. त्यातच दिवाळीत शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे… Continue reading शिवप्रेमींसाठी खुशखबर; रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, पण..

धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

धर्मशाला (वृत्तसंस्था) : बॉलीवूडसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर या गुणी अभिनेत्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर उमदा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतसिंगबरोबर ‘कैपोचे’ चित्रपटात काम केलेल्या आसिफ बसरा या अभिनेत्याने आज (गुरुवार) आत्महत्या केली. ते ५३ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात… Continue reading धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब… Continue reading एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, या मागणीसाठी वेतनासाठी संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे जळगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र सरकारला जाग आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस आणि दोन महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना… Continue reading एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

error: Content is protected !!