नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे  थोड्या कालावधीपुरता लॉकडाऊनचा प्रस्ताव पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाऊन असेल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

केजरीवाल म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्‍या लोकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. आता फक्त ५० लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. दिल्तीत गेल्या १० दिवसांत नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. प्रतिदिन ८००० पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. प्रदूषण, जास्त चाचणी, निष्काळजीपणा यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आम्ही शक्यतो प्रयत्न करीत आहे, मात्र सध्या काही काळ राज्यात पुन्हा लॉकडाऊनबाबतचा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला आहे. गर्दी वाढल्यास बाजारपेठा बंद केल्या जातील.