पुणे (प्रतिनिधी) : महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी पायल रोहतगी आणि व्हिडिओ तयार करण्यात आलेल्या एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील वादग्रस्त ट्विट करुन पायल रोहतगी चर्चेत राहिलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि त्यांचे कुटंबीयांवर खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगीने प्रसारित केला होता. यातून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.