कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना होऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार का ? यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला खासदार मंडलिक यांनी प्रचारासाठी सुरुवात केली आहे. याला आता नवं वळण लागलं असून विद्यमान खासदारांच्या उमेवारीला भाजपचेच नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध केला आहे.

चंदगड परिसरात पार पडलेल्या एका कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलताना संग्रामसिंह कुपेकर यांनी ही भुमिका थेट व्यासपीठावरुन जाहीर करताना म्हणाले की, माजी विनंती आहे भाजपच्या वरिष्ट नेत्यांना विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नका. ते आपल्या मतदार संघात कीती वेळा आले ? असा सवाल काही उपस्थितांना विचारत विरोध करण्याचं हे मुख्य कारण असल्याचं ही म्हटलं आहे.

तसेच गतवेळी आम्ही खासदार महाडिक यांना विरोध करुन मोठी चूक केली आहे. अशी ही भुमिका यावेळी त्यांनी घेतली. त्यामुळे खासदार मंडलिकांना उमेदवारी मिळणार की नाही ही चर्चा सुरु असताना आता आणखी एक नवं संकट विद्यमान खासदरांसमोर उभ राहीलं आहे.

त्यामुळे आता कोल्हापूरची लोकसभेसाठीची लढत दुरंगी होणार की तिरंगी यावरुन ही चर्चा वेग धरु लागल्या आहेत. कारण महायुतीने उमेदवारी नाकारल्यास खासदार मंडलिक अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा ही आता दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरलोकसभेच्या निवडणूकीचं चित्र अद्याप ही स्पष्ट झालं नसल्याची स्थिती आहे.