नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ५५ वर्षीय अशोक गस्ती यांची प्रकृती बिघडल्याने मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अशोक गस्ती यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मनिष राय यांनी दिली.

उत्तर कर्नाटकातील रायचूर येथील अशोक गस्ती होते. त्यांनी बूथ वर्करपासून आपल्या कामाला सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशोक गस्ती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करत अशोक गस्ती यांना श्रद्धांजली वाहिली.