मुंबई (प्रतिनिधी) : दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. काल (शुक्रवारी) MCX वर सोन्याचा व्यवहार ४१८ रुपयांनी वाढून ५० हजार ७०० रुपयांपर्यंत प्रति १० ग्रॅमवर झाला. दिवसाच्या गुरुवारी सोनं ५० हजार २८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तरीही सोनं आपल्या सर्वाधिक स्तराहून ६ हजारांनी स्वस्त आहे. 

चांदीच्या किंमतीत शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. चांदीचा व्यवहार ७४८ रुपयांनी वाढून ६० हजार ९२० रुपये प्रति किलो वर बंद झाला. दरम्यान इंट्रा डे मध्ये चांदीचा भाव ६१ गजार ३२६ रुपयांपर्यंत पोहोचला.डॉलरच्या किंमतीमध्ये झालेली घसरण आणि अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजला लागलेला उशीर यामध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्योरीटीजचे वरिष्ठ एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले.

दिवाळीपर्यंतही सोन स्वस्त होणे शक्य नाही, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्विसचे कमोडीटी वॉइस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी सांगितले. सोन्याचा दर उंचावरुन खाली येत ५० हजारपर्यंत आलाय. तर चांदी ६० हजारांच्या घरात आहे. येणाऱ्या काळातही हा चढउतार सुरु असेल. दिवाळीपर्यंत सोनं ५० ते ५२ हजार प्रति १० ग्रामच्या रेंजमध्ये असेल, असे सांगितले जात आहे.