मुंबई : साडी ही महिलांच्या सौन्दर्यात चार चांद लावते . साडी ही प्रत्येक महिलांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न असतो. प्रत्येक स्त्री आणि मुलीना साडी नेसणं आवडत असते. . ती साडी सहावारी असो अथवा नऊवारी. आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जात आहे. भारतातील काही काही भागात तर महिला रोजच्या जीवनात साडी नेसत असतात. पण हीच साडी नेसणं हे महिलांच्या जीवाला बेतू लागले आहे. हो हे आमचं नाही तर तज्ज्ञांचं मत आहे. साडी नेसल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो

साडी कॅन्सर म्हणजे काय?

साडी कॅन्सर हा खरंतर नऊवारी साडी नेसताना तिची पहिली गाठ अत्यंत टाईट बांधली जाते. त्यावर साडीची किनार आणि कमरेवरील त्वचा यांच्यात घर्षण होतं. ते सतत झालेल्या घर्षणामुळे कधीकधी त्वचा सोलून निघते.. कधी त्वचा काळीसुद्धा पडते. सहावारी साडी नेसताना महिला आतून पेटीकोट घालतात. तेव्हा पेटीकोटची गाठ टाईट बांधतात. त्यामुळे तिथेही गाठ दररोज एकाच ठिकाणी बांधली जात असेल तर तिथेही त्वचा सोलून निघून जाते. कारण कमरेच्या हाडावर असलेली त्वचा अत्यंत नाजूक असते. आणि साडी नेसण्याचा काळ जास्त असल्यास तिथल्या पेशींमध्ये कर्करोग निर्माण होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलंय. आणि या कर्करोगाला साडी कॅन्सर म्हणतात.

संशोधनातून माहिती समोर

बिहार आणि झारखंडमधून अजूनही त्याची प्रकरणे समोर येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये यावर संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात केवळ साडीच नाही तर धोतराचाही समावेश करण्यात आला आहे. साडी कॅन्सर हे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक केस समोर आल्यावर दिले होते. ज्यामध्ये 68 वर्षीय महिलेमध्ये कॅन्सर आढळून आला हो, जिथे ती महिला केवळ 13 वर्षांची असल्यापासून साडी नेसत असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणे साडीच्या कर्करोगाची आहेत.