कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेंतर्गत आज राजेंद्रनगर, भारतनगर, साळोखेपार्क (झोपडपट्टी) या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली.

या जनजागृती रॅलीमध्ये मास्क लावा, सामाजिक अंतर पाहा, वारंवार साबनाने हात धुवा, रस्तयावर थुंकू नका आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, अशा घोषणा देण्यात येऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

या रॅलीमध्ये नगरसेविका‍ रुपाराणी निकम, नगरसेवक लाला भोसले, नगरसेवक जयंत पाटील, सहायक आयुक्त संदिप घार्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, आरोग्य निरिक्षक सुशांत कावडे, स्वच्छता दूत अमित देशपांडे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच नागरिक उपस्थित होते.