पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : ना. जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धरणक्षेत्र वगळता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसतो. संभाव्य पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत आघाडीवर कार्यरत रहावे, अशा सुचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्या. ना. जयंत पाटील म्हणाले की, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू… Continue reading पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : ना. जयंत पाटील

जिल्ह्यात १५ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश आणि स्पष्टीकरणांना १ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दिनांक १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. पत्रकात म्हटले आहे की,  दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री… Continue reading जिल्ह्यात १५ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी

आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा सेविका तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांच्या या प्रश्नाबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून आशा सेविकांच्या बाजू त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती जि.प.च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दिली. त्या गडमुडशिंगी येथे आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या सत्कारावेळी बोलत होत्या. शौमिका महाडिक म्हणाल्या की,… Continue reading आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार : शौमिका महाडिक

आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

गारगोटी (प्रतिनिधी) : आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत विनापरवाना दारात मंडप टाकून गर्दी जमवून लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता, नवरा-नवरी, भटजीसह ५० लोकांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे शिवाजी केरबा पाटील यांच्या मुलाचे लग्न होते. यावेळी विनापरवाना दारात मंडप टाकून कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता लोकांच्या उपस्थितीत  लग्नकार्य… Continue reading आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

शिंगणापूर मधील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान…

शिंगणापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढलं आहे. यामुळे पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी आणि लाकडाचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी शेणी दान करावेत, असे आवाहन प्रशासनाच्यातर्फे करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत  शिंगणापूर येथील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी गणेश चव्हाण, किशोर पाटील, संतोष… Continue reading शिंगणापूर मधील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान…

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए. वाय. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती दिनानिमित्त कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे सरचिटणीस… Continue reading राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए. वाय. पाटील

मुरगूडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साधेपणाने संपन्न करण्यात आली. यशवंत सेना, मुरगुड धनगर समाजाच्या वतीने येथील नगरपालिका सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना कॉ. बबन बारदेस्कर यांच्या हस्ते  शंभर मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या कार्याची माहिती आप्पाजी मेटकर यांनी… Continue reading मुरगूडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने…

राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठ गावातील राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सप्रे कुटुंबीय, यश मेटॅलिक्स शिरोली एमआयडीसीच्या वतीने या गरजू कुटुंबीयांना हे किट पन्हाळा पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राजसी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष शब्बीर मुजावर, संचालक कोंडेकर, राजेश… Continue reading राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेणार असतील आणि प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे मत आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर ता भुदरगड येथे आज आ. पाटील आले होते,त्यावेळी ते बोलत होते. भुदरगड तालुका सकल… Continue reading ‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा : ग्रामस्थांची मागणी

टोप (प्रतिनिधी) : शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा तरच महापुराच्या पाण्यापासून शिरोली, शिये, कसबा बावडा, भुते, निगवे, चिखली ही गावे वाचणार आहेत. महामार्गाची उंची वाढली तर ही गावे पाण्याखाली जातील त्यामुळे पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी शिरोली व शिये ग्रामस्थांनी केली. बास्केट ब्रिज, गांधीनगर फाटा येथील ब्रिज, पंचगंगा नदीवरील पुल… Continue reading सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा : ग्रामस्थांची मागणी

error: Content is protected !!