गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेणार असतील आणि प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे मत आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर ता भुदरगड येथे आज आ. पाटील आले होते,त्यावेळी ते बोलत होते. भुदरगड तालुका सकल मराठा समाज अखिल भारतीय मराठा महासंघ भुदरगड तालुका शाखेच्या वतीने निवेदन देणेत आले ,यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

पाटील म्हणाले, बहुतांशी मराठा समाज हा  गरीब आहे. समाजला  फडवणीस सरकारनें आरक्षण मिळवून दिले. सर्वोच्च न्यायालयात बाजू  मांडण्यास आताचे ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास उशीर झाला असला तरी उशिरा का होईना उत्तर आयुष्यत शरद पवार यांनी प्रयत्न करावा त्यांच्या पाठीशी उभा राहू असे ठाम मत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  प्रविणसिंह सावंत, नाथाजी पाटील, पार्थ सावंत, संदीप पाटील, नंदकुमार शिंदे, शक्तीजित पोवार, सुशांत माळवी, सचिन भांदिगरे आदी उपस्थित होते.