पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठ गावातील राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सप्रे कुटुंबीय, यश मेटॅलिक्स शिरोली एमआयडीसीच्या वतीने या गरजू कुटुंबीयांना हे किट पन्हाळा पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी राजसी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष शब्बीर मुजावर, संचालक कोंडेकर, राजेश कांबळे, युसुफ मुजावर, शकील मुतवली, ग्रा.पं. सदस्य, जमीर आत्तार,  दत्ताजी राणे उपस्थित होते.