कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज (गुरुवार) सकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. रेखावार यांनी ऑगस्ट २०१२ ते ऑगस्ट २०१३ या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट २०१३ ते फेब्रुवारी २०१४ मध्ये सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी… Continue reading कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार…

थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका अशी सूचना आ. चंद्रकांत जाधव यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ते वीज वितरण… Continue reading थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : आ. चंद्रकांत जाधव

केंद्र सरकारच्या निषेधार्थ हातकणंगले काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली…

हातकणंगले (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सात वर्षांच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅससह विविध पदार्थांचे भाव वाढवले आहेत. महागाईमुळे सामान्य जनतेचे जीवन कठीण बनले आहे. याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) हातकणंगले येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. हे आंदोलन आ. राजूबाबा आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. केंद्र सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आले आहे. जनतेच्या… Continue reading केंद्र सरकारच्या निषेधार्थ हातकणंगले काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली…

‘गोकुळ’तर्फे स्‍वयंसेवकांना जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे प्रशिक्षण

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या आनंदराव पाटील – चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्‍य, सचिव व दूध उत्‍पादक शेतकरी, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर. बी. पी. स्‍वयंसेवकांना जनावरांवरील आयुर्वेदिक औषधोपचार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज (गुरुवार) ताराबाई पार्क येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील यांचे हस्‍ते झाले. आर.बी.पी. स्‍वयंसेवकांसाठी हा प्रशिक्षण… Continue reading ‘गोकुळ’तर्फे स्‍वयंसेवकांना जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे प्रशिक्षण

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ बंधने…

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणपती उत्सवाला  जाणाऱ्यांसाठी खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबाबत एसटी महामंडळाने तयारी केली आहे. कोकणात प्रवास करताना प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवासापूर्वी सर्व बसेसचे निर्जंतूकीकरण केले जाणार आहे. यंदा गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत.… Continue reading गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ बंधने…

राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला : १५ बंधारे पाण्याखाली

राशिवडे (प्रतिनिधी) : गेले महिनाभर उघडीप दिलेल्या पावसाने दोन-तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे. वेधशाळेने पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी येथील लक्ष्मी जलाशयामधून १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे भोगावती नदी पात्राबाहेर आली आहे. तर पंचगंगा नदी पात्राबाहेर पडण्यास एक फूट अंतर… Continue reading राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला : १५ बंधारे पाण्याखाली

…अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील ! : ललित गांधी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असूनही सरकारने व्यापार सुरू करायला परवानगी न दिल्याने व्यापार्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे व्यापारी अत्यंत संतप्त झाले असून त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला… Continue reading …अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील ! : ललित गांधी

राजाराम तलाव पर्यटनस्थळ होण्याबाबत आ. ऋतुराज पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे आ. ऋतुराज पाटील यांनी भेट घेऊन विकास आराखडा आणि आवश्यक निधीबाबत चर्चा केली. आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, तळ्यांचे शहर अशी ओळख असणाऱ्या  कोल्हापूरमध्ये सरनोबतवाडी आणि आसपासच्या परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा, यासाठी छ. राजाराम महाराजांनी १९२८ मध्ये ‘राजाराम… Continue reading राजाराम तलाव पर्यटनस्थळ होण्याबाबत आ. ऋतुराज पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा

इंजिनीअरिंग कृती समितीचे समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंजिनीअरिंग कृती समितीने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणी संदर्भात समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी लोंढे यांनी, ज्या शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर जाणून घेऊन त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. कुठल्याही विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीमुळे कुठल्याही कागदपत्रांसाठी अडवले जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील… Continue reading इंजिनीअरिंग कृती समितीचे समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन…

‘अनलॉक’ तूर्त नाहीच ; राज्यात निर्बंध कायम राहणार : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊनचे चटके सोसत असणाऱ्या जनतेची आणि व्यापाऱ्यांची राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधातून सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आज (बुधवार)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत… Continue reading ‘अनलॉक’ तूर्त नाहीच ; राज्यात निर्बंध कायम राहणार : राजेश टोपे

error: Content is protected !!