हातकणंगले (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सात वर्षांच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅससह विविध पदार्थांचे भाव वाढवले आहेत. महागाईमुळे सामान्य जनतेचे जीवन कठीण बनले आहे. याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) हातकणंगले येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. हे आंदोलन आ. राजूबाबा आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

केंद्र सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आले आहे. जनतेच्या भावनांचा आणि आर्थिक अडचणीचा विचार करून तात्काळ केंद्रीय करात कपात करून भाववाढ कमी करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरूण जानवेकर, तालुका उपाध्यक्ष बबनराव पाटील, एस. एम. पाटील, बाजीराव सातपुते, डॉ. विजय गोरड, उत्तम पाटील, कपिल पाटील, सुनिल भोसले आदी उपस्थित होते.