जिल्हा परिषदेच्या आवारात अर्धनग्न आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यामध्ये बोगस शौचालय दाखवून सुमारे २ कोटींचा अपहार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रवीण जनगोंडा पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर आज (शुक्रवारी) अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. दरम्यान, पाटील आणि पोलिसांची यावेळी झटापट झाली. त्यामुळे जि.प.च्या आवारात काहीवेळ तणावाचे वातावरण पसरले होते.    अपहार  प्रकारणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी  प्रवीण पाटील यांनी वेळोवेळी  केली.… Continue reading जिल्हा परिषदेच्या आवारात अर्धनग्न आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट (व्हिडिओ)

राधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात

राधानगरी (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनापरवाना क्रिकेट स्पर्धा भरवल्या. क्रिकेट सामन्यांदरम्यान   शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ आणून  धिंगाणा  घातल्याप्रकरणी मुलाच्या वडिलासह तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  रघुनाथ दिनकर पाटील (रा.गवशीपैकी पाटीलवाडी ता. राधानगरी) असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलाचे नांव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ पाटील यांने आपला मुलगा भैरवनाथ याच्या वाढदिवसानिमित्त पाटीलवाडी… Continue reading राधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात

आर्थिक फसवणूक  करणाऱ्या टोळी मुकादमांवर गुन्हे दाखल करणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वाहतूकदार मालकांची  आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऊस मजूर मुकादम  यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.  यावेळी शैलेश बलकवडे म्हणाले की, ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक ही गंभीर  बाब आहे. फसवणूक झालेल्या  ऊस वाहतूकदारांनी टोळी मुकादमांशी केलेले करार,… Continue reading आर्थिक फसवणूक  करणाऱ्या टोळी मुकादमांवर गुन्हे दाखल करणार

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या आजी, भावाची हत्या करून आरोपीची आत्महत्या

नागपूर (प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या  ६५ वर्षीय आजी आणि १० वर्षाच्या भावाची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने मनकापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नागपूर परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई धुर्वे आणि यश धुर्वे असे हत्या झालेल्यांची नावे आहेत.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एकतर्फी प्रेमातून… Continue reading एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या आजी, भावाची हत्या करून आरोपीची आत्महत्या

राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दुपारी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खा. सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. यानंतर टोपे यांनी ही घोषणा केली. टोपे म्हणाले… Continue reading राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आगामी अधिवेशनात मांडले जाणार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीचे विधेयक

पुणे (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२०च्या प्रारूप विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२०-२१च्या अर्थसंकल्पात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाईल. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा… Continue reading आगामी अधिवेशनात मांडले जाणार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीचे विधेयक

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अनोख्या उपचार पद्धतीचा प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर कॅन्सर सेंटर २००० सालापासून रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे.  येथे आता आणखी एका अनोख्या उपचार पद्धतीला प्रारंभ झाला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात प्रथमच बोन मँरो ट्रान्सप्लांट (BMT) ही उपचारपद्धती दोन रुग्णांवर यशस्वीरीत्या पार पडली आहे. याचा लाभ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना होणार असल्याची माहिती डॉ. अभिजित गणपुले, डॉ. अनिकेत मोहिते आणि डॉ.… Continue reading कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अनोख्या उपचार पद्धतीचा प्रारंभ

जेजुरीत भाविकांना तीन दिवस प्रवेश बंद !

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जेजुरीचे पो. नि. सुनील महाडिक यांनी दिली. ते आज (गुरुवार) जेजुरी येथील खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाचा… Continue reading जेजुरीत भाविकांना तीन दिवस प्रवेश बंद !

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवी कृषी विधेयकाच्या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आणखीनच तीव्र होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन कायद्यात काही कमतरता असेल तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. शेतकरी संघटनांनी खुल्या मनाने चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं. मात्र शेतकरी संघटनांनी सरकारचं हे आवाहन… Continue reading शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

कोल्हापूर कोरोना अपडेट : २४ तासात २२ जणांना लागण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब अशी की दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९९५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : २४ तासात २२ जणांना लागण  

error: Content is protected !!