नागपूर (प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या  ६५ वर्षीय आजी आणि १० वर्षाच्या भावाची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने मनकापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नागपूर परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई धुर्वे आणि यश धुर्वे असे हत्या झालेल्यांची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एकतर्फी प्रेमातून लक्ष्मीबाई धुर्वे आणि  यश धुर्वेची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या केली.  त्यानंतर आरोपी फरार झाला होता. गुरुवारी रात्री त्याने मनकापुर परिसरात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

आरोपी धुर्वे कुटुंबातील तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. यातूनच त्याने तरुणीच्या घर जाऊन लक्ष्मीबाई व यश यांची धारधार शस्त्राने हत्या केली. या प्रकारानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येण्याआधीच आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच मनकापूर परिसरात रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली.