प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे. परंतु, ऊसाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी छ. राजाराम कारखान्याने ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे. यामधून प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचणार असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. ते लाटवडे… Continue reading प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार : अमल महाडिक

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या प्रकरणात ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. परंतु राज्यात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले जात आहे. कोणत्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे वातावरण आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सरकारवर सोडले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत… Continue reading महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू : देवेंद्र फडणवीस

मी कोल्हापूरचा माणूस, ट्रोलर्स खिशात घेऊन फिरतोय : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे. भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही. पक्षामध्ये तरुण आणि नवीन नेतृत्वाला संधी दिली जाते, असे स्पष्ट करत मी नाव कोणाचे घेत नाही. नाहीतर लगेच ट्रोलिंग चालू होईल. मी कोल्हापूरचा माणूस आहे, ट्रोलिंगला घाबरत नाही. मी ट्रोलर्स खिशात घेऊन फिरतोय, असे मिश्किल… Continue reading मी कोल्हापूरचा माणूस, ट्रोलर्स खिशात घेऊन फिरतोय : चंद्रकांत पाटील

कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असून सुद्धा नव्या संसदेवर खर्च का? : कमल हसन यांचा सवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या संसदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी या नव्या संसदेच्या गरजेबाबतचे काही सवाल उपस्थित केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी… Continue reading कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असून सुद्धा नव्या संसदेवर खर्च का? : कमल हसन यांचा सवाल

…तर भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट  

कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधीच राज्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाली नाही तर, ते गुप्तरित्या लोकांना पाठवून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचू शकतात,  असा गंभीर आरोप पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपवर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेत… Continue reading …तर भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट  

सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : सभासद व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जळालेल्या ऊसाला तात्काळ उसतोड देऊन गाळपासाठी न्यावा, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी छत्रपती राजाराम कारखाना कृषी अधिकारी यांना दिल्या. टोप आंब्याचा मळा येथील ११ एकर क्षेत्रातील काल (शनिवारी) जळालेल्या ऊस क्षेत्राला माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन ऊसतोड करण्यास सांगितले. दरम्यान शॉर्टसर्किटने किंवा इतर… Continue reading सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी : अमल महाडिक

शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

चंदीगड (वृत्तसंस्था) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्दी बाजूला ठेवत पंजाब पोलिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे डीआयजी (जेल) लखविंदरसिंग जाखर यांनी राज्यातील प्रधान सचिव (गृह) यांना आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जाखर यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून सेवेतून अकाली सेवानिवृत्तीची मागणी केली आहे. ते म्हणाले… Continue reading शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

…तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती करू नये, या मागणीसाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६ वाजता दसरा चौकातून मुंबईत धडक मारणार आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला तरी गनिमी काव्याने मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहे. बळाचा वापर करून पोलिसांनी अडवणूक केल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद करू, असा इशारा… Continue reading …तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. चर्चेच्या फेऱ्या काय करता, निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘शेतकरी ऐन थंडीत… Continue reading चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी

‘या’ राज्यात नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस

केरळ (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाला जखडून टाकणाऱ्या कोरोना महामारीवर अखेर लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी सरकारकडून मोठा प्लॅन सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना लशीबाबत एका राज्यात मोफत लस देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. भारतात फार्मा कंपनीच्या कोणत्याही… Continue reading ‘या’ राज्यात नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस

error: Content is protected !!