टोप (प्रतिनिधी) : ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे. परंतु, ऊसाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी छ. राजाराम कारखान्याने ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे. यामधून प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचणार असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. ते लाटवडे येथे बोलत होते.

अमल महाडिक म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर होणाऱ्या ऊस उत्पादन वाढीच्या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचव्यात. जमिनीची सुपीकता वाढवून, बियाणे निवडीपासून ऊस तोडीपर्यंत नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या  बांधापर्यंत पोचविणे हा उद्देश आहे. तो आम्ही पूर्ण करणारच असा ठाम विश्वास माजी आमदार आणि  कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

या वेळी चेअरमन सर्जेराव माने,  माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, उत्तम पाटील, अमर पाटील, श्रीकांत पाटील, संचालक दिलीप पाटील, सिद्धू नरबळ,  बिरदेव तांनगे यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.