कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेच्या  पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाच्यावतीने ताराबाई पार्क येथील आत्माराम अपार्टमेंट ते मेनन बंगला रोड येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम  सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे  १५  ऑक्टोबर ते ९  नोव्हेंबर  या कालावधीत हा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सासने मैदान ते वामन हरी पेठे ज्वेलर्स या मार्गावर वळविण्यात आली आहे. तरी शहरातील नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन  ड्रेनेज विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.