कोल्हापूर ( प्रतिनिधी) : नोव्हेंबर, डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २० नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची २४ तास हेल्पलाईन नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी दिली.

परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने सुरु केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ही सेवा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कलावधीत सुरु राहील. जिल्हानिहाय समुपदेशक असे : कोल्हापूरसाठी शशिकांत कापसे, मो – 9175880008, सांगलीसाठी भारती  पाटील, मो 9579680108 व साताऱ्यासाठी दिपक कर्पे मो. 9822352620 असा आहे. विद्यार्थी, पालकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी असे- एस. एम. आवारी, विभागीय सचिव मो. 9423462414. डी. बी. कुलाळ, सहसचिव मो. 7588636301. एस. एस. सावंत, सहाय्यक सचिव 8007597071. पी. एच. धराडे, वरिष्ठ अधीक्षक मो. 9850020790. एस.

एल. हावळ, वरिष्ठ अधीक्षक (इ. 12 वी.) मो. 9890772229, एस. वाय. दुधगांवकर, सहाय्यक अधीक्षक मो. 7020704131, एम. सी. आंबेकर, सहाय्यक अधीक्षक मो. 8177852551, जे. के. बांते, पर्यवेक्षक लिपिक, 9423703092, एन. डी. अहेरराव, पर्यवेक्ष‍क लिपिक, मो. 9922878893.