कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया योजनेंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार खेलो इंडिया सेंटर निर्माण करायचे आहेत. त्यासाठी इच्छुक क्रीडा संघटनांनी आपले प्रस्ताव http://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
पत्रकात सांगितल्याप्रमाणे, अॅथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युदो, रोईंग, शुटींग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, कुस्ती, फूटबॉल आणि देशी खेळांचा यामध्ये समावेश असणार आहे. नोंदणीकृत जिल्हा क्रीडा संघटना कमीत कमी ५ वर्षांपासून त्या खेळात कार्यरत असणे आवश्यक आहे. संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर सराव करणारे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील कमीत कमी १५ मुले आणि १५ मुली असे एकूण ३० खेळाडू आवश्यक आहेत. प्रशिक्षण केंद्रावर सराव करण्यासाठी खेळाडूंसाठी आवश्यक मैदान, प्रशिक्षण साहित्य, निवास व्यवस्था आणि आवश्यक असणाऱ्या सोईसुविधा संघटनांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी पात्रता धारक प्रशिक्षक आवश्यक आहेत. या बाबी पूर्ण करणाऱ्या जिल्हा क्रीडा संघटनाच यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.