उंड्री (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधे कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता,कोल्हापूर प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत गावोगावी कोरोना अँटिजेन टेस्ट कॅम्पचं आयोजन केलेले आहे.याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील उंड्री उपकेंद्रांतर्गत उंड्री आणि निवडे गावांमध्ये आरोग्याधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी १०० नागरिकांचे अँटिजेन घेतले. त्यापैकी १२ पॉझिटीव्ह आले आहेत.

यावेळी आरोग्यसेवक युवराज गाडगीळ, परिचारिका संगीता जाधव, सरपंच शहाजी यादव, पोलिसपाटील शहाजी कुदळे, ग्रामसेवक कुंभार, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.