मुंबई – बॉलिवूडची क्युट अभिनेत्री अनन्या पांडे ही आपल्या क्युटनेस मुळे कायम चर्चेत असते. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द एअर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर तिने अनेक सुपर हिट सिनेमे दिले आहेत. पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल २, आणि खो गाये हं कहा, या सिनेमामध्ये अनन्या पांडे हिच्या अभिनयाला लोकांनी पसंती दिली. अनन्या कोणत्याना ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते . आता ती सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.आदित्य आणि अनन्या यांच्या ब्रेकअपची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या – आदित्या यांच्या ब्रेअकपची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अनन्या हिने एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री स्वतःच्या भावना व्यक्त करत म्हणाली, ‘जर तो तुमचा असेल तर तुम्हाला नक्की भेटेल… तुमच्याकडे पुन्हा येईल. धडा शिकवण्यासाठी त्याने तुम्हाला सोडलं आहे. जर तो खरंच तुमचा असेल, तर तुमच्याकडे परत येईल. तुम्ही त्याला स्वतःपासून दूर केलं असेल तरी तो परत येईल… काही गोष्टी प्रचंड सुंदर असतात पण त्या तुमच्या नसतात….’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर डेटिंग

आशिकी २ अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे परदेशी सुद्धा अनेकदा एकत्र हॉलिडेला गेले होते. दोघांच्या जोडीला चाहते खूप पसंती देतात. दोघांनी जाहिरातीमध्ये ही एकत्र काम केलं आहे. गोघांचा ब्रेक अप झाला आहे की नाही हे दोघांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.