चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत म्हणून चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) रवळनाथ मंदिर, चंदगड येथे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे मंदीरे खुली करावीत म्हणून भाजपच्या वतीने सर्वत्र आंदोलन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून चंदगड तालुका भाजपच्यावतीने रवळनाथ मंदिरच्या दारात आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील सर्व मंदिरे चालू करावीत, अशी मागणी केली. जर मंदिरे चालू केली नाहीत तर पुढच्या काळात उग्र आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी भाजप युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष नितीन फाटक, शांताराम पाटील, रत्नप्रभा देसाई, योगेश कुडतरकर, अमोल गुळामकर, कार्यकर्ते उपस्थित होते.