कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या (शुक्रवार दि २ ऑक्टोबर) रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.  कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस आणि चिकन विक्रेत्यांनी नोंद घेऊन  दुकाने बंद असणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधीत दुकान मालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.