मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी (दि.३०) दिलीप वळसे पाटील यांचा वाढदिवसही आहे.

नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व मंत्री कोरोनामुक्त झालेले आहेत.