कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणासाठी खासगी बसेसमधून होणाऱ्या प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिला आहे.

खासगी बसेस बुकिंग काऊंटरवर मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत याबाबत प्रबोधन करण्यात आले असून, सूचना फलक लावण्यात आला आहे. वाहन प्रकारानुसार परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडे आकारणीच्या दीडपट पर्यंत भाडे खासगी बसेसद्वारा आकारले जाऊ शकते. त्यापेक्षा ज्यादा भाडे आकारणी केल्यास तक्रारकर्त्याने आपले नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासाचा दिनांक, तिकीट, वाहनाचा प्रकार, ट्रॅव्हल्सचे नाव इत्यादी माहितीसह mh०९@ mahatranscom.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही  प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारीस यांनी केले आहे.