अमरावती – सध्या लोकसभा निवडणुकेचं रणांगण चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे आरोप प्रत्यआरोपाचे फेरी सुरु आहेत अशातच अमरावती मतदार संघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावती मतदार संघातून महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जेव्हा पासून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तेव्हा पासून आमदार बच्चू कडू यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. बच्चू कडू आणि नवनीत राणा यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमरावतीतलं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी दिनेश बाबू यांच्यावर निशाणा साधला आहे

काय म्हणाले रवी राणा ..?

रवी राणा म्हणाले , प्रहारचे उमेदवार दिनेश बाबु हे दारू आणि जुगारातच व्यस्त असतात, असं वक्तव्य रवी राणांनी केलं आहे. रवी राणांनी केलेल्या टीकेनंतर प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी चांगलेच संतापलेत. तुमच्याही बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील असा इशाराच बच्चू कडू यांनी दिल्यात. बच्चू कडू इतक्यावरच थांबले नाही, तर नवनीत राणा यांना पाडण्यात सर्वात मोठा हात रवी राणांचा असेल त्यांची भाषा आणि वागणूकीमुळे नवनीत राणा पडतील असा पलटवार बच्चू कडू यांनी केला. आता यावर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे.