दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना वीर मरण आले. यांना श्रद्धांजली म्हणून निगवे खालसा, कावणे, वडकशिवाले, इस्पुर्ली परिसरात आज (सोमवार) ‘एक दिवा शहीदां’साठी म्हणून गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी अमर रहे-अमर रहे शहीद जवान संग्राम पाटील, शहीद जवान ऋषिकेश जोंधळे अमर रहे अशा घोषणा देत गावातून मुख्य रस्त्यावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये परिसरातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.