गगनबावडा (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र गगनबावडा तालुका शाखा स्थापन झाली असून भास्कर माने अध्यक्षपदी तर तुकाराम पडवळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. अध्यक्षस्थानी राज्य सचिव आणि सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख प्रा. एस. एन. पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गगनबावडयाच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट होत्या.

यावेळी माधुरी परीट यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच निवडीची पत्रेही देण्यात आली. महाआवास अभियानामध्ये गगनबावडयाचा राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

माधुरी परीट म्हणाल्या की, ग्राहकाचे अज्ञान, संघटनाचा अभाव असल्यामुळे ग्रामीण नागरिकांना जास्त फसवले जाते. ही फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहकांनी सजग राहण्यासाठी, निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असते. ती या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी, ग्राहकांच्या समस्याबाबत, अन्याय विरुद्ध लढण्यासाठी माझा सदैव पाठिंबा असल्याचे सांगितले.

प्रा. एस. एन. पाटील यांनी, माझ्या तालुक्यात शाखा नाही याची खंत सदैव वाटत होती. ती आज पूर्ण झाली असून संवाद व समन्वयात ग्राहक कल्याण आहे हे समजून घेतले पाहिजे. कार्यशाळा, मेळावे घेऊन ग्राहकात जागृती केली जाईल. ग्राहकांना जागृत करण्याच्या उद्देशाने गगनबावडा येथे शाखा स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.

तर, संघटक गुरुनाथ कांबळे, सह संघटक पांडुरंग जाधव, सह संघटक डॉ. मेघाराणी जाधव, सचिव विलास पाटील, सहसचिव सरदार पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाटील, सल्लागार आनंदा पाटील, सल्लागार तानाजी पाटील, सदस्य नामदेव चौधरी यांची निवड करण्यात आली.

यावेळी गजानन वापीलकर, रघुनाथ पाटील, लाईव्ह मराठीचे पत्रकार संभाजी सुतार, बाजीराव तळेकर, भिवाजी कांबळे, स्वप्निल वरेकर, नंदा रोकडे, रवी सुतार आदी उपस्थित होते.