मुंबई (प्रतिनिधी) : कोतवालच्या रास्त व न्याय मागण्या त्वरित मान्य कराव्यात, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष विजयकुमार चौरपगार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव महसूल व वनविभाग, विभागीय आयुक्त अमरावती, पवनीत कौर (जिल्हाधिकारी अमरावती) यांच्यामार्फत देण्यात आले.

निवेदन देताना महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष बी. ए. राजगडकर, महासचिव पी. एस. धुर्वे, कोषाध्यक्ष व्ही. यु. दंदे, डॉ. विजय बसवनाथे, राजेश चौरपगार, रंगराव तायडे, कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप पळसपगार, जिल्हा उपाध्यक्ष विजय पेढेकर, सचिव सचिन मरकाम, कार्याध्यक्ष रोशन दातार, तालुका अध्यक्ष अमोल नवलकार (दर्यापूर), राजेश मोहोकार (मोर्शी), देवा सुरत्ने (चिखलदरा), पिंपोळे (धामणगाव, सतीश जवंजाळ (भातकुली), पंकज पर्वत (चांदूर रेल्वे), संजय राक्षसकर (अंजनगाव), रवींद्र भारती (तिवसा), सुवर्णा बेले, जयश्री टिवरे, सगणे, बेलसरे, वानखडे, नीलेश पोहणकार, योगेश भोकरे, रियाज शहा, बाळू घुरडे, राहुल तायडे, गजानन पवार यांच्यासह महिला व पुरूष कोतवाल बांधव उपस्थित होते.