हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचा सन २०२० ते २०२१ सालातील २८ वा गळीत हंगामासाठी गव्हाणीत मोळी टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. प्रकाश आवाडे आणि इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या हस्ते तर काटा पुजन संस्थापक आणि माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

चालू गळीत हंगामासाठी जवाहर कारखान्याकडे २१ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. मागील हंगामाप्रमाणे यावर्षी आपला उस पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी केले.

यावेळी स्वप्नील आवाडे, जि.प. सदस्य राहुल आवाडे, माजी चेअरमन उत्तम आवाडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, सपना आवाडे,कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक सुरज बेडगे, आजी-माजी संचालक, सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.