कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात व्हॉट्सपच्या माध्यमातून दोन महिलांनी ओळख करून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीमध्ये कमीशनवर व्यवसाय करण्यासह कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाची ६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शानी आणि गांधी अनैशा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या महिलांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर अभिनव निवास साळुंखे (वय २७ रा.भगतसिंग कॉलनी प्रतिभानगर, कोल्हापूर ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

राजारामपुरी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, दिं २२ ऑक्टोबर सकाळी ११ ते २३ ऑक्टोबर रात्री ८ दरम्यान फिर्यादी अभिनव साळोखे यांच्या मोबाइलवर पार्टटाईम काम करून दिवसाला ८०० ते ३ हजार कमवा असा मँसेज आला होता. या मॅसजमध्ये व्हॉट्स अॅप नंबरही देण्यात आला होता. त्यामुळे अभिनव यांनी त्या नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी संशयित शानी या महिलेने आपण अॅमाझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीमध्ये मॅनेजर असून आमच्या कंपनीकडेकडे ऑर्डर जास्त असतात. त्यामुळे तुम्ही कमिशन वर व्यवसाय करू शकता.

तसेच गुंतवणूक करणाऱ्याला पार्टटाईम कंपनीत नोकरी दिली जाते. असे सांगत कांही ऑर्डर देऊन त्यावर कमिशन देवून संशयित महिलेनं अभिनव यांचा विश्वास संपादन केला. तसेच दोन संशयित महिलांनी ऑनलाईन कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो. असे आमिष दाखवत कंपनीमध्ये ६ लाखांची आँनलाईन गुंतवणूक करून घेतली.

त्यानंतर अभिनव यांनी या दोन महिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे अभिनवने अॉनलाईन फसवणूक झाल्याप्रकरणी संशयित महिलांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.