मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षाच्या तारखा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केल्या आहेत. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेची अधिसूचना www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.