गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्याला सन २०२०-२१ मध्ये राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांच्या हस्ते गटविकास अधिकारी माधुरी आर.परीट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानामध्ये गगनबावडा तालुक्यातील सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी अरुण बिडवे, कनिष्ठ लेखा अधिकारी संतोष ओतारी, उपभियांता बाजीराव मिसाळ, मोहनदास दाभाडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता विकास पाटील, डाटा ऑपरेटर उमाकांत पडवळ, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य आणि योगदान लाभले.