कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १०० दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून शहर आणि ग्रामीण भागात दमदार पाऊस सुरू आहे. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील दुपारी १२ वा. पाणी पातळी ३१.३ फूट आहे. जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्याना पाण्यातून व खड्ड्यातून जपूनच जावे लागत आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा : तुळशी- ४४.९८ दलघमी, वारणा- ४१४.१८ दलघमी, दूधगंगा- २५५.२१ दलघमी, कासारी- ४०.१८ दलघमी, कडवी-२९.८६ दलघमी, कुंभी- ३८.९५ दलघमी, पाटगाव- ४८.०९  दलघमी, चिकोत्रा- २०.५० दलघमी, चित्री- २०.३८ दलघमी, जंगमहट्टी- १८.२७ दलघमी, घटप्रभा- ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ- २०.८५, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे- लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे : राजाराम ३१.८ फूट, सुर्वे ३०.२ फूट, रुई ६०.६ फूट, इचलकरंजी ५६.६ फूट, तेरवाड ४९.९ फूट, शिरोळ ३९ फूट, नृसिंहवाडी ३५.३ फूट, राजापूर २५.४ फूट तर नजीकच्या सांगली ८.३ फूट व अंकली १२.७  फूट अशी आहे.