राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील पहिल्या ग्रामपंचायत संचलित लहान मुलांच्या कोव्हिड सेंटर हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी खासदार राजू शेटटी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. प्रकाश आवाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास खरात, हातकंणगले तहसिलदार उबाळे, जयसिंगपूर नगराध्यक्ष निता माने,… Continue reading राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

ऋतुराज फौंडेशनच्या वतीने वाफेच्या मशीनचे वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत या संकल्पनेनुसार हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या स्थरातून मदत केली जात आहे. ऋतुराज फौंडेशनच्यावतीने कोल्हापूर शहर आणि कोव्हिड सेंटरमधील रुग्ण, फ़्रंटलाइन वर्कर, वृद्धाश्रम आणि बालकल्याण संकुलामध्ये सहा हजार वाफेचे मशीन देण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माज़ी उपमहापौर अर्जुन माने, कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वच दुकाने सुरु करण्यास अनुमती द्यावी, अन्यथा..! : धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्ग सर्वाधिक भरडला गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने समविषम तारखेला किंवा अन्य काही नियम लावून, व्यापार सुरू करण्यास परवानगी दयावी. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत तरी सध्या सर्व दुकाने उघडण्यास अनुमती दयावी. ज्या व्यापार्‍यांकडून सरकार कर गोळा करत आहे, त्यांच्यावरच अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत तातडीने सर्व दुकाने… Continue reading सर्वच दुकाने सुरु करण्यास अनुमती द्यावी, अन्यथा..! : धनंजय महाडिक

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासन तसेच जिल्हा प्रशासनाने काढलेल्या अनलॉकच्या परिपत्रकानुसार व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले आहेत. शासनाच्या ४ जून २०२१ रोजीच्या नवीन परिपत्रकातील चुकीच्या नियमाप्रमाणे या आठवड्यात देखील व्यापार सुरु होऊ शकलेला नाही. मात्र, आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा उद्या (बुधवार) रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत… Continue reading कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा… : चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा

आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

पुणे (प्रतिनिधी) : मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढीवारीवर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळेही मागील वर्षाप्रमाणे सर्व सोहळे प्रमुखांना पादुका बसमधून नेण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला. मात्र सर्व सोहळेप्रमुखांनी त्याला नकार दिला आणि पायी वारी करण्याची भूमिका घेतली. शासनाने यावर समिती नेमली आणि समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला. यावर निर्णय येण्यापूर्वीच वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी… Continue reading आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २,१७५ जणांची कोरोनावर मात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात २,१७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासात १, ४५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचारासाठी १२ हजार ७६८ रुग्ण दाखल आहेत.

राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन, संवर्धन करा : ना. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजाराम महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबतची माहिती घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी करून डिजीटायझेशन करून या ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्याची सूचना केली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.पाटील यांनी दिली. ना. पाटील यांनी महाविद्यालयामधील प्राचार्य… Continue reading राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन, संवर्धन करा : ना. सतेज पाटील

युवासेनातर्फे ना. उदय सामंत यांच्या हस्ते शंभर पीपीई किट्सचे वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) ;  कोरोनाचा प्रार्दुभावामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्यावर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) युवासेनेच्या वतीने कोल्हापूरचे संपर्क मंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेसना पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने केले… Continue reading युवासेनातर्फे ना. उदय सामंत यांच्या हस्ते शंभर पीपीई किट्सचे वाटप…

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना ७५ टक्के लस मिळणार मोफत…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (सोमवार) देशभरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना २१ जूनपासून मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. आता आज (मंगळवार) आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची बातमी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली २१ जूनपासून लागू होईल. त्यानुसार, केंद्र सरकारने व्हॅक्सीन बनवणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केलेल्या व्हॅक्सीनपैकी ७५ टक्के राज्यांना… Continue reading केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना ७५ टक्के लस मिळणार मोफत…

शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटीलेटर सुपूर्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज (मंगळवार) जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या व्हेंटीलेटरचा स्वीकार केला. तात्पुरत्या स्वरुपात शहरातील सीपीआर, इचलकरंजीतील आय.जी.एम, गडहिंग्लज येथील एस.डी.एच रुग्णालयाकडे हे व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात येणार असून गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात याचा… Continue reading शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटीलेटर सुपूर्त

error: Content is protected !!