टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील  नागांव येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एका तरूणाने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. परंतु, या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परसु अर्जुन देवकर (वय ३५) असे त्याचे नाव असून याने आज (शनिवार) सकाळी राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केली.

परसु देवकर हा गवंडी काम करीत होता. आज  सकाळी ६.३० च्या सुमारास उठून फोनवर बोलत घराबाहेर गेला  होता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने आपल्या राहत्या घरीच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची  शिरोली पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.