आजरा (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा गडहिंग्लज येथे आज (शनिवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेजस्विनी दशरथ परितकर (वय २८, रा. गजरगाव, ता. आजरा) असे तिचे नाव आहे. आजरा पोलिसांत या प्रकारची नोंद झाली आहे.

परितकर यांनी दोन दिवसांपूर्वी विषारी औषध  प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा आज (शनिवार) उपचारावेळी मृत्यू झाला. डॉ. प्रकाश पट्टणशेट्टी यांनी याबाबतची फिर्याद आजरा पोलिसांत दिली असून हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गुरव तपास करीत आहेत.