कळे (प्रतिनिधी) : विषारी औषध प्राशन केलेल्या मोरेवाडी (ता. पन्हाळा) येथील जयश्री परशराम मोरे (वय ३०) या महिलेच्या आत्महत्त्या प्रकरणी संशयित आरोपी तिचा पती परशराम निवृत्ती मोरे (वय३६) याला कळे पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सासू, सासरा व पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून सोमवारी (दि.२० जून) रोजी तिने विष प्राशन केले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान जयश्रीने दिलेल्या फिर्यादीनुसार पती परशराम (वय ३६), सासू सावित्री (वय ६०), सासरा निवृत्ती (वय६५) यांच्याविरोधात  कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी (दि. २७) दुपारी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जयश्रीचा पती परशराम याला कळे पोलिसांनी अटक केली.