शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे एका ५५ वर्षीय महिलेचा धारदार हत्याराने निर्घृण खून कऱण्यात आला. हा प्रकार आज (सोमवार) सकाळी उघडकीस आला. अंजना पोळ ( वय ५५,  रा. टाकवडे) असे खून झालेल्या महिलेचे नांव आहे. या प्रकऱणी संशयित आरोपीला शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे.   

हा खून रविवारी रात्रीच्या सुमारास झाला असावा. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती देताच शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरूवात केली आहे.