मुंबई ( वृत्तसंस्था ) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील काही टीव्ही चॅनेल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीनी करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलावली होती, त्यामुळे या बातमीला बळ मिळाले. मात्र यावर शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या अनेक नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट कले आहे की, त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा कोणताही विचार नाही या बातम्या निराधार आहेत. बैठकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये विलीन झाल्याच्या बातम्या निराधार आहेत, चिन्हासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही याचा इन्कार केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्या या निव्वळ अफवा असून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेसकडून शरद पवारांवर असा दबाव टाकला जात आहे का ? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की, शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी रणनीतीबाबत आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेतली. आणि आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या रूपाने जोरदार लढण्याचा संकल्प केला आहे. शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादीच्या वतीने या मुद्द्यावर पुढे आले. हे वृत्त निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.