सोलापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असून, याबाबतचं नियोजन ही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलं असल्यानं या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे की, सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यातसाठी येतात. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुशीलकुमार शिंदेंचं भाजपवर टिकास्त्र..!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय विचारसरणीची भाषा बदललेली आहे. लोकांनी अशा भुलथापा देणारा पंतप्रधान दोन वेळेस स्वीकारला. भाजप फक्त मोदी आणि त्यांची गॅरंटी असे म्हणतात मात्र कसली गॅरेंटी आहे, ते त्यांनाच माहिती आहे. आम्ही पन्नास वर्ष राजकारणात आहोत. कसली गॅरेंटी दिली नाही, जनताच तुम्हाला गॅरेंटी देते. लोक आमच्या बाजून आहेत, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.