मुंबई (प्रतिनिधी) : भाजपला रामराम करून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्यांना कोणते पद मिळणार? याबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. खडसे यांना कोणते पद द्यायचे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
इतर पक्षाच्या आमदार-खासदारांना इतक्यात राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार नाही. त्यांना प्रवेश कधी द्यायचा याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ठीक आहे. मात्र, त्यांना थोडीशी सर्दी असल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांचा आज (शुक्रवार) दुपारी २ वाजता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. पक्षाच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थित हा प्रवेश होणार आहे.