उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नियमितपणे पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, शरीराच्या इतर समस्या दूर होतात. त्यासोबतच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.जेव्हा पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते, किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होणे, याला डिहायड्रेशन (निर्जलीकरण) असे म्हटले जाते. यामध्ये मीठाच्या कमतरतेचा ही समावेश होतो

डिहायड्रेशन’ची लक्षणे

  • घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही ‘डिहायड्रेशन’ची लक्षणे आहेत.
  • मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे ही ‘डिहायड्रेशन’ची आणखी काही लक्षणे आहेत.
  • ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊनही ‘डिहायड्रेशन’ होऊ शकते. उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे ‘डिहायड्रेशन’चा त्रास होतो.

डिहायड्रेशनची कारणे

१. डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रूपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय.

२. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाणी कमी प्रमाणात पिणे

३. सतत उन्हात खेळणे इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.

डिहायड्रेशनवर उपाय

१. डिहायड्रेशनवर मुख्य उपाय म्हणजे सतत पाणी प्यावं.

२. सर्वसाधारपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवं.

३. उन्हाळ्यात नियमित पाणी, फळं, फळांचा रस प्यायला पाहिजे,

4. . उन्हाळ्यामध्ये दिवसातून एक ते दोनवेळा शहाळ्याचं पाणी किंवा लिंबू पाणी प्यावं.

5. एक ग्लास पाण्यामध्ये साखर, चिमूटभर मीठ आणि ओआरएस टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होतं
.
6. कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.