नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म जेमिनीवर एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदींवर निराधार आरोप केल्याचा आरोप आहे, त्यानंतर सरकार आता Google कंपनीला नोटीस पाठवू शकते. अशा माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वापरकर्ता माहिती शोधत असताना ट्विटर युजरच्या पोस्टला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर यांनी संकेत दिले की सरकार त्यावर कारवाई करू शकते. त्यांनी लिहिले, “हे आयटी कायद्याच्या अंतर्गत आयटी नियम ३ (१) (बी) आणि फौजदारी कायद्याच्या अनेक तरतुदींचे थेट उल्लंघन करत आहेत.”

दुसरी पोस्ट फॉरवर्ड करताना श्रीमोय तालुकदार नावाच्या ट्विटर युजरने लिहिले की, गुगलच्या एआयने एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेले उत्तर पक्षपात दर्शवते, याची नोंद घेत केंद्र सरकार आत Google या आंतराष्ट्रीय कंपनीला जाब विचारण्याच्या तयारीत आहे.