कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही विघ्नसंतोषी लोक दर्शनासाठी वशिल्याच्या किंवा स्पेशल लोकांना सोडले जात असल्याची व्हिडिओ व्हायरल करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. परंतू तसे काहीही घडलेले नाही. या व्हिडिओमधील प्रवेश करणाऱ्या मुली मंदीरातील ऑफीसमध्ये काल ऑडीटसाठी आल्या होत्या. आज ही हेड ऑफीसमध्ये त्यांचे ऑडीटींगचे काम चालू आहे.
भावीकांना कळकळीची विनंती आहे की कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका. नवरात्र उत्सवातील सर्व पुजाअर्चा व्यवस्थित चालू आहेत. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने लवकरच हे कोरोनाचे संकट टळून सर्व भावीकांसाठी मंदीराचे दरवाजे उघडू देत हीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना असल्याची विनंती देवस्थान समितीने केली आहे.