हेरवाड (प्रतिनिधी) : आई-वडीलांपेक्षा आयुष्यात मोठे काहीच नाही. आई वडील हेच आपला आदर्श असतात. प्रत्येकजण शाळेत नंतर शिकतो. तर पहिले गुरू आई-वडील असतात. ते चालते बोलते विद्यापीठ आहे. म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्या सेवेतच खरा देव आहे, असे प्रतिपादन किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांनी केले. ते हेरवाड येथे  आदमापूर पायी दिंडीचे स्वागतावेळी बोलत होते.

माने म्हणाले की, म्हणाले, आयुष्यात कितीही कष्ट होत असले तरी आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडू नका.  त्यांनी सांगितलेले मनापासून ऐका.रा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पायी दिंडीतील महाराज, गावातील वारकरी मंडळी, भाविक उपस्थित होते.